
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यालयावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) छापेमारी केली आहे. ट्रान्सफर-पोस्टिंग आणि कथित भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर भगवंत मान यांनी भाजपवर निशाणा साधत, ‘भाजपने पंजाब विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे,’असा आरोप केला आहे.
या प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सोमवारी CBI चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी CBIने भगवंत मान यांच्या कॅम्प ऑफिसवर कारवाई केली. भगवंत मान यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या छापेमारीवर प्रतिक्रिया दिली. ‘भाजपने पंजाब निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. माझ्या कॅम्प ऑफिसवर CBIची छापेमारी झाली आहे. आता पंजाबमध्ये ED आणि CBIचा गैरवापर केला जाईल. पंजाब सरकार आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असा दावा त्यांनी केला.




























































