असं झालं तर… आधार कार्डावरील नाव चुकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधार कार्डावरील नाव दुरुस्ती आणि बदलाच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. यासंदर्भात UIDAI ने एक नवीन प्रमाण कार्यपद्धती जारी केली आहे.

नावात सुधारणा, चुका दुरुस्त करणे, लग्न किंवा घटस्फोटानंतर नाव बदलणे आणि पूर्ण नाव बदलणे यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.

नवीन नियमांनुसार सादर केलेले शपथपत्र, गॅझेट नोटिफिकेशन आणि ओळखीचे पुरावे यांची कडक तपासणी झाल्यानंतरच अर्जावर प्रक्रिया केली जाणार आहे.

‘मायनर नेम चेंज’साठी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कुटुंबाच्या प्रमुखाच्या आधारे नाव अपडेट करताना नातेसंबंधाचा पुरावा वापरता येईल.

नावात संपूर्ण बदल करायचा असेल तर शासकीय राजपत्र अधिसूचना अनिवार्य असेल. अनिवार्य कागदपत्रांची सत्यता तपासल्यानंतरच नाव अपडेट केले जाईल.