
दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना अॅमेझॉनने पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. या नवीन कपातीचा फटका अमेरिका, हिंदुस्थान आणि युनायटेड किंगडममधील कर्मचाऱ्यांना बसला आहे. हिंदुस्थानात दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार असल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
स्टोर्स युनिटमधील ग्राहक सेवा आणि सेलिंग पार्टनर सर्व्हिससह अनेक महत्त्वाच्या विभागांवर या कपातीचा परिणाम होणार आहे. यंदा अॅमेझॉनने कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 1,000 पेक्षा कमी आहे. या संपूर्ण प्रकरणावर कंपनीच्या एका प्रवक्त्याने ई-मेलद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमच्या स्टोअर्स व्यवसायाच्या काही भागांमध्ये पुनर्रचना करण्यात आली आहे. अॅमेझॉन सध्या धोरणात्मक पद्धतीने टप्प्याटप्प्याने नोकऱ्या कमी करत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी कंपनीने मोठय़ा प्रमाणावर कपात करत तब्बल 30,000 नोकऱ्या कमी केल्या होत्या.
कोरोना काळात मेगाभरती
कोरोना महामारीच्या काळात कंपनीने गरजेपेक्षा जास्त भरती केली होती, अशी कबुली अॅमेझॉनचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष जेफ बेजोस यांनी मुलाखतीत दिली आहे. बेजोस म्हणाले, ‘लोक घरातच राहत होते. परिणामी मोठय़ा प्रमाणावर ऑनलाइन ऑर्डर वाढल्या. त्या पूर्ण करण्यासाठी प्रचंड मनुष्यबळाची गरज होती.




























































