
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलनासाठी निघालेल्या सीजेपीच्या नेत्यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी विमानातूनच अटक केली होती. यानंतर तब्बल 24 तासांनी त्यांची सुटका करण्यात आली आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके, सौरव दास व आशुतोष रांका यांना दिल्ली कँट येथील एसीएम न्यायालयात हजर करण्यात आले आणि विशेष न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्यांची सुटका केली. मात्र अटी-शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Executive Magistrate orders release on the condition that CJP leaders will not engage in breach of peace for one year: CJP’s Ratna Singh
— Live Law (@LiveLawIndia) October 11, 2026
सीजेपीच्या कायदेशीर कामकाज विभागाच्या प्रमुख रत्ना सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे. अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना एका वर्षासाठी “शांतता भंग” न करण्याची अट घालण्यात आली आहे. यासोबतच वर्षाच्या कालावधीसाठी शांतता आणि चांगल्या वर्तणुकीची हमी म्हणून 50 हजार रुपयांच्या जातमुचल्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. यानंतरच सीजेपी नेत्यांची सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान सीजेपी नेत्यांच्या अटकेनंतर या आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदेंकडे सोपवण्यात आली आहे. मात्र आता सीजेपी नेत्यांच्या सुटकेनंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. दुपारी २ वाजता हे तिघेही संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आशुतोष रांका यांनी दिली.
CJP Protest – अभिजित दीपके, सौरव दास, आशुतोष रांका यांची 24 तासानंतर सुटका; अटी-शर्तींसह जामीन मंजूर
























































