पूर्णेकर हत्याकांड प्रकरण : मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र यांची नऊ तास चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या सूत्रधार शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला होता. पूर्णेकर यांचे पुत्र राम यांच्या जबाबाच्या आधारे पुरवणी एफआयआरमध्ये या दोघांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. याप्रकरणी अखेर 14 दिवसांनंतर आज राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यांची नऊ तास चौकशी करण्यात आली.

ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने राजेंद्र शिंदे यांची चौकशी केली. ते दुपारी 12 वाजता पोलिसांसमोर हजर झाले. पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपींसोबत पह्टो, कॉल डीटेल्स, पूर्णेकर कुटुंबीयांचे आरोप या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिंदे यांची चौकशी केली. रात्री नऊच्या सुमारास चौकशीनंतर ते पोलीस ठाण्यातून निघाले. दरम्यान, अटकेतील आरोपींचा तपास सुरू असून त्यातून ज्या कुणाची नावे पुढे येतील त्यांची चौकशी करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) अमरसिंह जाधव यांनी सांगितले.

आरोपींच्या कोठडीत वाढ

अटकेतील आरोपी पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार यांना आज ठाणे न्यायालयात हजर केले असता पप्या याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर अन्य दोघांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

एकनाथ शिंदे 14 दिवसांनंतर बोलले

पूर्णेकर हत्येच्या 14 दिवसांनंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर बोलले. हत्येतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे ते म्हणाले.

राम पूर्णेकर यांच्याकडून अटकेची मागणी

सूत्रधारांना अटक न झाल्यास एकनाथ शिंदे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम यांनी दिला होता. आजही त्यांनी राजेंद्र व मीनाक्षी शिंदे यांच्या अटकेची मागणी केली