
रशिया आणि यु्क्रेन मधील एका छोट्या युद्धविरामानंतर आता पुन्हा एकदा हल्ले सुरू झाले आहेत. अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, युक्रेनने रशियच्या ऑइल रिफायनरीवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
अल्पकालीन युद्धविराम संपल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी जाहीर केल्यानंतर काही तासांतच हे हल्ले झाले. यादरम्यान अमेरिकेसोबतचे त्यांचे संबंध अधिक ताणले गेले आहेत.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, युक्रेनने गुरुवारी पहाटे मॉस्कोच्या आग्नेयेकडील र्याझान भागातील एका रिफायनरीवर मोठा हल्ला केला. एअर डिफेन्स यंत्रणेने रिफायनरीवर हल्ला करणारे युक्रेनचे चार क्षेपणास्त्रे आणि ६९ ड्रोन पाडले, परंतु ड्रोनच्या तुकड्यांमुळे रिफायनरीला आग लागल्याचे त्यांनी सांगितले.
नावे जाहीर न करण्याच्या अटीवर बोललेल्या एका वरिष्ठ युक्रेनियन अधिकाऱ्याने रात्रीच्या हल्ल्यादरम्यान युक्रेनने र्याझान रिफायनरीवर हल्ला केल्याची पुष्टी केली.

























































