दिल्ली पोलिसांविरोधात महिला रस्त्यावर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक देणाऱया आणि त्यांचे हक्क हिरावून घेणाऱया पोलीस कारवाईविरोधात शनिवारी ऑल इंडिया महिला सांस्कृतिक संगठन (एआयएमएसएस), क्रांतिकारी युवा संघटन (केवायसी) यांच्यासह अन्य संघटनांतील महिलांनी पोलीस कारवाईच्या विरोधात मोर्चा काढला. महिला संघटनांनी रस्त्यावर येऊन जोरदार आंदोलन केले. एसआयआर रद्द करा… वोट चोर, गद्दी छोड… मतांची चोरी सहन करणार नाही… ज्ञानेश कुमार राजीनामा द्या…दिल्ली पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा निषेध अशा घोषणा महिलांनी दिल्या.