
दिल्लीत शनिवारी एका दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (डीटीसी) बसने अनेक वाहनांना धडक दिल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. टिकरी बॉर्डरच्या दिशेने जाणाऱया बसच्या धडकेत ई-रिक्षा, दोन मोटारसायकली आणि एक स्कूटर आली. ही बस महिला चालवत होती. या घटनेनंतर ती घटनास्थळावरून फरार झाल्याचा आरोप आहे.
























































