कोलकाता येथे दुर्गा देवी मंडपात चेंगराचेंगरी; 18 जणांचा मृत्यू, 50 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोलकाता येथील चोरबागान परिसरातील दुर्गा देवी मंडपात आज झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 13 महिला, 4 पुरुष आणि एका सात वर्षीय मुलाचा समावेश आहे. या घटनेत सुमारे 50 जण जखमी झाले आहेत.

सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे अनेक जण मंडपात थांबले. त्याचवेळी अनेक भाविकांनी मंडपात जाण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.