
कडक उन्हात दिवसभर अंगाची लाहीलाही होत असताना विजयादशमीच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी रत्नागिरी शहरात पावसाने हजेरी लावली. दुष्काळाला सामोरे जात असताना पावसाने सुखद झलक दिली.
सायंकाळी साडेपाचच्या आकाशात ढग दाटून आल्याने पावसाच्या चाहूलीने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्याचाही तडाखा बसला. यंदा रत्नागिरी जिल्ह्यात फक्त ७७ टक्के पाऊस पडल्याने दुष्काळाचे संकट पसरले आहे. अशा परिस्थितीत आज सायंकाळी पावसाने सर्वांना सुखद धक्का दिला.


























































