आंदोलनाला परदेशातून फंडिंग येत असेल तर हे गृहमंत्र्यांचं अपयश, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला परदेशातून फंडिंग येत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर बोलताना शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. ” परदेशातून जर एवढं फंडिंग आपल्या देशापर्यंत पोहचू शकतं हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. त्यासाठी गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”पाकिस्तान चीन इथून फंडिंग येतंय हे जर खरं असेल तर तुम्ही देशाच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. एवढं फंडिंग आपल्या देशापर्यंत पोहचू शकतं हे देखील त्यांचं अपयश आहे. देशात 12 वर्ष झालं मोदींचं सरकार आहे. 12 वर्षापूर्वी मोदीजी म्हणाले होते की पाकिस्तान आपल्याकडे डोळे वर करून बघू शकणार नाही. मग इतकं फंडिंग येत असेल तर ते त्यांचं अपयश आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.