‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’ वेब सीरिजमधून डिजिटल पदार्पण करणार अजय देवगण…

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आपल्या डिजिटल पदार्पणासाठी सज्ज असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता अजय हॉटस्टार स्पेशलच्या क्राईम ड्रामा वेब सीरिजमधून आपले डिजिटल पदार्पण करणार असल्याचे समजते आहे. या वेब सीरिजचे नाव ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’ असे आहे. या वेब सीरिजमध्ये अजय एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर प्रदर्शित केली जाणार आहे.

या वेब सीरीजची शूटिंग लवकरच मुंबईत सुरु होणार आहे. एंटरटेनमेंट आणि बीबीसी स्टुडिओ मिळून या वेब सीरिजची निर्मिती करणार आहे. आपल्या डिजिटल पदार्पणाबद्दल अजय म्हणाला आहे की, ‘नेहमीच चांगल्या लोकांसोबत काम करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’ ही प्रेक्षकांना बांधून ठेवणारी गोष्ट असून या प्रवासाच्या सुरूवातीची मी आतुरतेने वाट पाहत आहे. पडद्यावर एका पोलिसाची भूमिका साकारणे माझ्यासाठी नवीन नाही, मात्र या वेळी हे पात्र अधिक कठीण आहे. या पात्राच्या व्यक्तिरेखेने मी सर्वाधिक प्रभावित झालो आहे.’

अजयने यापूर्वीच निर्माता म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. नेटफ्लिक्सवर त्यांचा ‘त्रिभंग’ हा होम प्रोडक्शन चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये काजोलने मुख्य भूमिका साकारली होती.

आपली प्रतिक्रिया द्या