
पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. यात शुभ-अशुभ घडले की ते पाच पटीने वाढते. याच संकल्पनेवर आधारित ‘पंचक’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. मनोरंजन करणारा असा हा कौटुंबिक चित्रपट 5 जानेवारीला प्रदर्शित हात आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे यांचे असून डॉ. श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने यांची निर्मिती आहे. तर नितीन प्रकाश वैद्य हे कार्यकारी निर्माता आहेत.
टीझरमध्ये दिसतेय की, पंचकमुळे सर्वांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आता कोणाचा नंबर लागणार याची भीती वाटतेय. हीच भीती विनोदी शैलीत सादर केली आहे. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी काय सर्कस करणार हे पाहायला मजा येणार आहे. माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने हा खास चित्रपट घेऊन येत आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता धुरी, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर असे उत्तम कलाकार यात आहेत.
माधुरी दीक्षित या चित्रपटाबद्दल म्हणतात, ‘‘पंचक ही आमची दुसरी निर्मिती असून यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. गंभीर परिस्थिती अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न ‘पंचक’मधून करण्यात आला असून सिच्युएशनल कॉमेडी आणि ब्लॅक पामेडी यांचा मेळ यात पाहायला मिळणार आहे.’’




























































