देशात आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती; आपण मोदींच्या हुकुमशाहीखाली जगतोय, अरविंद केजरीवाल यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सध्याची परिस्थिती आणीबाणीपेक्षाही वाईट असून आपण मोदींच्या हुकुमशाहीखाली जगत आहोत, अशी टीका आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीतील आंदोलनापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातूनच अटक करण्यात आली. यावरून केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विविध मुद्द्यांवर कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झालेल्या अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी विमानातूनच अटक केली. दिल्ली पोलिसांचे महिला पथक विमानात गेले आणि तिघांना ताब्यात घेतले. यानंतर राजकारण तापले असून विमानातून उतरूही न देता ‘कॉक्रोच’ना अटक करण्याची कृती सरकारच्या मनातील अभूतपूर्व भीती दर्शवणारी असल्याची टीका केजरीवाल यांनी केली.

केजरीवाल म्हणाले की, ही परिस्थिती आणीबाणीपेक्षाही वाईट आहे. हे आता अधिकृत झाले आहे की आपण मोदींच्या पूर्ण हुकूमशाहीखाली जगत आहोत. विमानांतून उतरताच ‘कॉक्रोच’ना अटक करणे ही कृती सरकारच्या मनातील अभूतपूर्व भीती दर्शवणारी आहे.

2 डरपोक, 40 हजार गुलाम, लाखो शूरवीर! दिल्लीतील नाकाबंदी आणि कारवाईवरून अनुराग कश्यप यांचा सरकारवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण मतचोरीच्या माध्यमातूनच निवडणूक जिंकल्याची जाणीव आहे आणि त्यामुळेच आपला गैरप्रकार लपवण्यासाठी ते लोकशाही पूर्णपणे चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी केली. तसेच ज्ञानेश कुमार यांना जावेच लागेल, पण मोदींनाही जावे लागेल, असा इशाराही केजरीवाल यांनी दिला.