
दु-खद आणि वेदनादायी – शरद पवार
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दु-खद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची अमिट छाप उमटवली. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’, ‘नटसम्राट’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले. कलाकार म्हणून यशस्वी असतानाच सामाजिक प्रश्नांप्रति असलेली त्यांची बांधिलकी आणि ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून केलेली कृतिशील समाजसेवा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच प्रेरणादायी पैलू होता. त्यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वाने एक संवेदनशील आणि प्रतिभावान कलाकार, तर समाजाने एक कृतिशील व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नानांची एक्झिट धक्कादायक – आदित्य ठाकरे
आपल्या अष्टपैलू अभिनयाने आणि खणखणीत संवादफेकीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. चित्रपटसृष्टीतील योगदानासोबतच ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱयांसाठी केलेले सामाजिक कार्य सदैव स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
नानांचे अचानक जाणे चटका लावणारे – डॉ. प्रकाश आमटे
गेल्या 40 वर्षांपासून आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. बाबांशी त्यांची मैत्री होती. विजया मेहता यांच्यासोबत नाटकाच्या प्रयोगासाठी ते चंद्रपूरला आले असता बाबांसोबत आनंदवनात गेले. आनंदवन बघून ते इतके भारावून गेले की, सगळे सोडून मी इथेच काम करतो असे म्हणाले होते. त्यावर तू ज्या क्षेत्रात आहेस तिथे नाव कमव. तिथे राहूनदेखील तू सामाजिक क्षेत्रात काम करू शकतो, असा सल्ला बाबांनी त्यांना दिला. त्यानंतर नानांच्या जीवनात बदल झाला. बाबा भेटले नसते तर कदाचित मी भरकटलो असतो, असे ते नेहमी म्हणायचे. नाटकात चांगले पैसे मिळायला लागल्यावर त्यांनी आनंदवन, हेमलकसाला देणगी दिली, पण कधी वाच्यता केली नाही. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटात त्यांनी माझीच भूमिका साकारली होती. शूटिंगसाठी ते महिनाभर घरासमोर राहिले. आमच्या कुटुंबाचा ते एक भाग होते. त्यांचे अचानक निघून जाणे मनाला चटका लावणारे आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांनी श्रद्धांजली वाहिली.
मकरंद अनासपुरे यांच्या अश्रूंचा बांध फुटला
जेव्हा नाना पाटेकर यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आले त्यावेळी नानांचे जिवलग मित्र-अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या अश्रंtचा बांध फुटला. मकरंद आणि नाना यांनी एकत्र येऊन शेतकऱयांसाठी ‘नाम’ संस्था उभी केली होती. विदर्भ आणि मराठवाडय़ातील हजारो शेतकऱयांना मदत केली होती.
एक अष्टपैलू अभिनेता, संवेदनशील व्यक्ती आणि उत्कृष्ट समाजसेवक आज आपल्यातून निघून गेला. नाना यांचा स्पष्टवत्तेपणा, साधेपणा आणि सत्याला सत्य म्हणण्याचे धाडस त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवत होते. काही व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जातात; पण त्यांचा आवाज, त्यांचे उपकार, त्यांची शिकवण आपल्या मनात कायमची जिवंत राहते. नाना अशा व्यक्तिमत्त्वांपैकीच एक होते. ‘केबीसी’च्या विशेष कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. जिंकलेली रक्कम त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱयांसाठी दिली होती. हे त्यांच्या समाजसेवेचे उत्तम उदाहरण होते. – अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते
नाना पाटेकर यांच्याकडे असलेली तीव्रता, वेगळेपण आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व फारच थोडय़ा अभिनेत्यांकडे होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेत विलक्षण अष्टपैलूत्व आणि सर्जनशीलता आणली, तसेच अशा काही भूमिका साकारल्या ज्या पिढय़ान्पिढय़ा लक्षात राहतील. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि रोखठोक मतांसाठीही ते ओळखले जात. आपल्या मनातील विचार मांडताना ते कधीच कचरत नसत. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील नाना पाटेकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु-खद आहे. आपल्या अभिनयाने आणि साकारलेल्या भूमिकांनी त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर तसेच प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली. या दु-खाच्या प्रसंगी माझ्या मन-पूर्वक संवेदना त्यांच्या शोकाकुल कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसोबत आहेत. – राहुल गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते
नाना पाटेकर जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनानेसुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला. परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
हृदय पिळवटून टाकणारी बातमी… माझा नाना फ्रॉम पुना आता आपल्याला सोडून देवाघरी गेला. त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्या प्रेमळ रागावण्याची, आपुलकीने ओरडण्याची आणि त्यांच्या अपार मायेची कायम आठवण राहील. – सुनील गावसकर, माजी क्रिकेटपटू
प्रायोगिक रंगभूमीवर माझा भाऊ आणि नाना पूर्वी एकत्र काम करत असत. तेव्हापासून आमचा परिचय होता. नायक असो, खलनायक असो वा विनोदी भूमिका… नाना ती भूमिका अक्षरश- जगायचे. मराठीशी घट्ट नाळ जपत हिंदी चित्रपटसृष्टीतही दबदबा निर्माण करणारे आणि उत्तुंग यश मिळवणारे कलावंत दुर्मिळच! त्यापैकी एक नाना होते.
– अरविंद सावंत, शिवसेना नेते, खासदार


























































