
धावत्या रेल्वेतील प्रवाशांच्या हातावर बांबूचा फटका मारून त्यांचे मोबाईल पळवणाऱया फटका गॅंगमधील सराईत चोरटा जेरबंद करण्यात आला आहे. हा आरोपी अंबिवलीच्या इराणी वस्तीतील असून कल्याण रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
हसन दारा जफर 19, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली. अमरावती एक्प्रेस या रेल्वेत प्रवास करणाऱया एका प्रवाशाचा मोबाईल शहाड आणि अंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान चोरीला गेला होता. प्रवासी रेल्वेच्या दाराजवळ उभा असताना बाहेर दबा धरून बसलेल्या चोरट्य़ांनी बांबूने त्याच्या हातावर फटका मारला होंता.





























































