ऑपरेशन थिटरमध्ये डॉक्टरने केलं नर्सला किस, व्हिडीओ व्हायरल होताच हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । उज्जैन

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे जिल्हा रुग्णालयात एका डॉक्टरने नर्सला किस केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने संबंधित डॉक्टरची हकालपट्टी केली आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णालयातील एका शल्यविशारद असलेला डॉ. राजू निदारिया हा तिथल्याच एका नर्सला किस करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओतील दृश्य पाहून रुग्णालयात एकच गहजब उडाला. व्हिडीओतील ठिकाण हे रुग्णालयाचं ऑपरेशन थिएटर असल्याचं निदर्शनाला आलं आहे. अशा प्रकारचं कृत्य व्यवसायासाठी अत्यंत निंदनीय असल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी निदारिया याला तत्काळ निलंबित केलं आहे. या प्रकरणी निदारियाला नोटीस जारी करण्यात आली असून व्हिडीओचं परीक्षण करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित नर्सचीही चौकशी सुरू आहे.