
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाटमाथा परिसरासह काही गावांमध्ये मंगळवारी सलग चौथ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राशा व चिखली येथे जमिनींना मोठमोठय़ा भेगा पडल्या आहेत, तर माळेगावला 35 ते 40 मीटर जागेत भूस्खलन झाल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. तसेच जवळील रस्त्याचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पालघरमध्ये चार दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के
भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा एकदा पालघरकरांची झोप उडाली आहे. चार दिवसांत आज दुसऱ्यांना डहाणू, तलासरी परिसराला तडाखे बसले. रिश्टर स्केलवर 3.5 इतकी भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू तलासरी तालुक्यातील पाटीलपाडा येथे होता. मात्र कुठेही पडझड किंवा जीवित हानी झालेली नाही.





























































