दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्याची विहिरीत उडी घेत आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोहगाव (भदाडे) येथील शेतकऱ्याने सततची नापिकी, कर्ज व दुबार पेरणीचे संकट, या सर्वांचा धसका घेत त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडसकीस आल्याने एकच खळबळ उडाली. गंगाधर मारोतराव मदनकर (७०) मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

जिल्ह्यातील काही भागात मृग नक्षत्राच्या पावसामुळे पेरणी झाली आहे. पाऊसच बेपत्ता असल्याने शेतकरी हवालदील आहे. परिणामी, दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. मृग नक्षत्रातील पावसाने गंगाधर यांनी आपल्या पाच एकर शेतात कपाशी व इतर पिकांची पेरणी केली होती. मात्र, मागील सहा ते सात दिवसांपासून पाऊस दडी मारून बसल्यामुळे त्यांना दुबार पेरणीची चिंता सतावत होती. पूर्वीच कर्जाचा डोंगर आता पेरणीसाठी पैसा कुठून आणावा, या चिंतेत तो राहायचा त्यातूनच शनिवारला रात्री कुणालाही न सांगता गावलगतच्या गुलजारीलाल डांगरा यांच्या शेतातील विहीर गाठली व उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह विहिरीत तरंगतांना काही नागरिकांना आढळला.