
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेते आलोक नाथ यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखिका व निर्मात्या विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्याची लेखी तक्रार मुंबईतल्या ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज शर्मा यांनी आलोक नाथ यांच्यावर कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली आहे.
Mumbai Police Additional CP Manoj Sharma says ‘Oshiwara Police has registered an FIR against Alok Nath under section 376 of IPC (rape) on the complaint filed by Writer Vinta Nanda.’ pic.twitter.com/m7A99o61Xt
— ANI (@ANI) November 21, 2018
दरम्यान, आलोक नाथ यांनी त्यांच्यावरील झालेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच आलोक नाथ यांच्या पत्नीने विनीता नंदा यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत विनीता नंदा यांना सोशल मीडिया, प्रसिद्धीमाध्यम अथवा सार्वजनिक ठिकाणी आलोकनाथ यांची बदनामी करण्यास करण्यास मनाई करावी अशी मागणी केली होती. मात्र मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.

































































