
पाकिस्तानच्या लाहोर-सियालकोट मार्गावर गाडी बंद पडल्यावर फ्रेंच महिलेवर तिच्या मुलांसमोरच अमानवी बलात्कार करणाऱया आबिद मलही आणि शफाकत या दोघा नराधमांना पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये घडलेल्या या पाशवी बलात्काराच्या घटनेनंतर पाकिस्तानी महिला संघटनांनी संतप्त आंदोलन उभारून दोघा बलात्काऱयांना भरचौकात जाहीर फाशी देण्याची मागणी केली होती. प्रवासी फ्रेंच महिलेवर दोघांनी अत्याचार केला तेव्हा त्या महिलेची तीन मुलेही समोर होती. या दोन फरार बलात्काऱयांना पोलिसांनी महिनाभराच्या शोध मोहिमेनंतर ताब्यात घेतले होते. या दोघांची डीएनए चाचणी करून त्यांना न्यायालयाने या प्रकरणात मृत्युदंड ठोठावला आहे.




























































