रायगडावर सापडला स्वराज्याचा अमुल्य ठेवा, मौल्यवान सोन्याची बांगडी आणि…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्राधिकरणामार्फत रायगडावर आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळालेल्या आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याची मौल्यवान बांगडी मिळालेली आहे. तसेच एक छोटा दिवाही आढळून आला आहे

अशाप्रकारे पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. तसेच या वस्तू ज्याठिकाणी मिळतात, त्यावरून त्या ठिकाणाचे वास्तविक ऐतिहासिक महत्त्व व माहिती समजण्यास मोलाची मदत होणार आहे.

gold-bangle

आज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडास भेट देऊन उत्खननात मिळालेल्या या ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली. यावेळी, पुरातत्त्व विभागाने केलेल्या या कामगिरीबाबत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

diva