
आषाढी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून, यासाठी 2 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

























































