अर्धा माणूस अर्धा रोबोट, जगातला पहिला रोबोमॅन होण्यासाठी वैज्ञानिकाने पालटले स्वत:चे रूप

दैनंदिन जीवन जगभरात घडणाऱ्या अनेक चित्रविचित्र घटना कानावर पडत असतात. ब्रिटनमध्येही अशाच प्रकारची घटना घडली आहे. येथील एका वैज्ञानिकाने स्वत:ला जगातला पहिला रोबोमॅन बनवण्यासाठी स्वत:चे रूपडेच पालटले आहे.

डॉक्टर पीटर स्कॉट मॉर्गन असे या वैज्ञानिकाचे नाव असून त्यांचे वय 62 वर्षे आहे. पीटर मॉर्गन यांना मोटर न्यूरॉन या नावाचा जीवघेणा आजार झाला होता. या आजारामुळे त्यांच्या मांसपेशी मृत होत होत्या. डॉक्टर पीटर इंग्लंडमधील डेवोन शहरात राहतात.

2017 साली त्यांना मोटर न्यूरॉन हा आजार झाल्याचे त्यांना कळले. यामुळे ते शारीरिक कष्टाची कामे करू शकत नसत. डॉ. मॉर्गन आपली 65 वर्षीय जोडीदार फ्रान्सीस हिच्यासोबत राहतात. नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांनी स्वत:चे शरीर अर्धे मानवी आणि अर्धे रोबोट या रूपात बदलण्याचा निर्णय घेतला. ही कल्पना त्यांना पूर्वी लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकात असलेल्या साइबोर्ग या व्यक्तिरेखेमुळे सुचली. साइबोर्ग हा अर्धा माणूस आणि अर्धा रोबो होता.

डॉक्टर मॉर्गन हे सध्या अशाच अनोख्या पद्धतीने स्वत:चे उरलेले आयुष्य जगत आहेत. ते सांगतात, या अवस्थेतही मला भावना आहेत. माझ्याकडे प्रेम आहे. मी मस्ती करू शकतो. विशेष म्हणजे मला खात्री आहे की, माझी स्वप्ने आणि ध्येये मी निश्चितच पूर्ण करू शकेन, मात्र त्यांच्या या वेगळ्याच प्रयोगामुळे त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. डॉक्टरांना वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया त्यांच्या शरीरावर कराव्या लागल्या.

मॉर्गन यांच्या चेहऱ्यावरील मांसपेशींना दुखापत होत होती. तेव्हा त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) या उपचार पद्धतीची मदत घेतली. या पद्धतीमुळे ते वेंटिलेटरद्वारे श्वास घेतात. तसेच त्यांच्या डोळ्यांचा उपयोग त्यांनी बऱ्याचशा कॉम्प्युटरची दुरुस्ती त्यांनी केली आहे. ही शस्त्रक्रिया 10 ऑक्टोबर 2020 मध्ये पीटर यांच्यावर करण्यात आली. यामुळे त्यांचा आवाजही बदलला.

त्यांच्या आधीच्या जीवनाला ते पीटर 1.0 आणि आताच्या बदललेल्या रूपाला पीटर 2.0 असे म्हणतात. सध्या डॉक्टर पीटर मॉर्गन सोयबोर्ग कलाकार म्हणून काम करत असून मनुष्य आणि कृत्रिम मानव कसे आयुष्य जगतो याची लोकांना ओळख करून देत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या