प्रियंका व बिपाशाचा एक्स बॉ़यफ्रेंड अडकणार लग्नबंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रियंका चोप्रा व बिपाशा बासू यांचा एक्स बॉयफ्रेंड असलेला हरमन बवेजा हा उद्या रविवार दिनांक 21 मार्च रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाआधीच्या कार्यक्रमांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात त्याच्या कॉकटेल पार्टीचे फोटो देखील आहेत.

हरमन बवेजाचे लग्न साशा रामचंदानी नावाच्या तरुणीसोबत होत आहेत. डिसेंबर 2020 मध्ये चंदिगढला त्यांचा साखरपुडा झाला होता. हर्मनने लग्नाआधी दिलेल्या कॉकटेल पार्टीला अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा नवरा राज कुंद्रा उपस्थित होते. तसेच हर्मनचे चित्रपटसृष्टीतले मित्र आमीर अली व आशीष चौधरीने देखील त्याच्या या पार्टीला हजेरी लावलेली. राज कुंद्राने त्याच्या इंस्टा स्टोरीवर हर्मनच्या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.

हर्मन हा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते हॅरी बवेजा यांचा मुलगा आहे. त्याने 2008 साली लव्ह स्टोरी 2050 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात प्रियंका चोप्रा ही त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. मात्र या चित्रपटाच्या वेळी प्रियंका व हर्मन यांच्या अफेयरची चांगलीच चर्चा रंगली होती.

हर्ममने विक्टरी, ढिशकॅ्यूँ, व्हॉट्स युअर राशी, चार साहीबझादे हे चित्रपट केले आहेत. मात्र त्याला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळवता आले नाही. प्रियंका चोप्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर हर्मनचे बिपाशासोबतही अफेयर असल्याच्या चर्चा होत्या.