
पाच दिवसांचे बँकिंग तातडीने लागू करावे, केंद्र सरकारच्या एकतर्फी व भेदभावपूर्ण पीएलआय योजनेची अंमलबजावणी स्थगित करून ती मागे घ्यावी, तसेच प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या प्रमुख मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स, रत्नागिरीच्या वतीने बँक ऑफ इंडिया, झोनल ऑफिस, शिवाजीनगर, रत्नागिरी येथे विविध बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.
8 मार्च 2024 रोजी झालेल्या 12 व्या द्विपक्षीय वेतन करारातील ९ व्या जॉईंट नोटमध्ये इंडियन बँक्स असोसिएशनने पाच दिवसांचे बँकिंग लागू करण्यास सहमती दर्शवून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मात्र, दोन वर्षांहून अधिक काळ उलटूनही हा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, दिलेला शब्द पाळून पाच दिवसांचे बँकिंग तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सहन करणार नाही
बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना न्याय्य वागणूक, वर्क-लाईफ बॅलन्स आणि तणावमुक्त कामाचे वातावरण मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आगामी वेतन करारासाठी चार्टर ऑफ डिमांडवर चर्चा, पेन्शन अद्ययावत करणे व सुधारणा, सर्व पेन्शनधारकांसाठी समान डीए फॉर्म्युला, एनपीएस अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत ओपीएस जाण्याचा पर्याय तसेच इतर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.






























































