
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
आयसीसीकडून २०१८ ते २०२३ सालामधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेण्डरची घोषणा करण्यात आली. या वेळी हिंदुस्थानचा क्रिकेट संघ या दरम्यान सर्वाधिक २०३ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यात ५१ कसोटी, ८३ वन डे आणि ६९ ट्वेण्टी-२० सामन्यांचा समावेश आहे. दरम्यान,‘ वेस्ट इंडीज १८६, इंग्लंड १७५, ऑस्ट्रेलिया १७४, पाकिस्तान १६४ आणि दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश १६० सामने खेळणार आहेत.



























































