
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन हा गेल्या महिनाभरापासून गायब असल्याचे समोर आले आहे. किम जोंगने गेल्या महिनाभरात एकाही कार्यक्रमाला त्याने हजेरी लावलेली नाही. त्यावरुन पुन्हा एकदा जगभरात किम जोंग उनच्या तब्येतीवरून चर्चा सुरू झाल्या आहेत.
किम जोंग उन हा 12 ऑक्टोबरला प्योनगाँगमधील क्षेपणास्त्राच्या प्रदर्शनात दिसला होता. त्यानंतर तो एकाही कार्यक्रमाला दिसला नाही. मात्र त्याच्या बंगल्यावरील रहदारीत वाढ झाली आहे. दरम्यान किम जोंग उन हा परत आजारी असल्याची चर्चा होत आहे. गेल्या सात वर्षात पहिल्यांदा असे झाले की किम जोंग इतके दिवस सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहिला होता.
गेल्या वर्षी किम जोंग उन बरेच दिवस कुणालाच दिसला नव्हता. त्यावेळी त्याच्या मृत्यूच्या देखील अफवा पसरल्या होत्या. कुणी त्याला कोरोना झाल्याचे देखील म्हटले होते.



























































