
नवरात्रीच्या काळात, एका लहानगीचा तिच्या कुत्र्यासोबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलीने देवीसारखा पोशाख आणि साज-शृंगार केलाय. तिने आपल्या कुत्र्याला माँ शेरावालीचे वाहन म्हणजेच सिंहाचे रूप दिले आहे. व्हायरल होत असलेल्या या रीलमध्ये ही चिमुरडी सोफ्यावर बसली आहे. समोर तिचा लाडका कुत्रा बसलाय. व्हिडीओसाठी सिंह कुठून आणणार म्हणून तिने कुत्र्याला समोर बसवून शक्कल लढवली आहे. तिच्या हातात एक परशुही आहे. @jakku.2017 या इंस्टा आकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘AI तुला सिंह बनवेल’, ‘सिंह मिळाला नाही तर काय झाले शेरू आहेच की’ अशा कमेंट्स आल्या आहेत. या व्हिडीओला 91 हजारांहून अधिक जणांनी लाईक केले आहे.

























































