कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरच्या कुपवाडा जिह्यात नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी आणि सुरक्षा दलासोबत जोरदार धुमश्चक्री झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले.

सुरक्षा दल केरन सेक्टरच्या जुमागंड परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. शनिवारी पहाटे साडेतीन वाजता जुमागंड परिसरातील नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलांना संशयास्पद हालचाल दिसून आली. जवानांनी संशयितांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार केला. याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते.