लालकृष्ण आडवाणी रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्याने शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रपृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी रुग्णालयात जाऊन लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.