अ‍ॅन कार्सन यांना साहित्याचा नोबेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ष 2026 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कॅनडाच्या ख्यातनाम कवयित्री, निबंधकार आणि अनुवादक अ‍ॅन कार्सन यांना जाहीर झाला आहे. स्वीडिश अकादमीने 8 ऑक्टोबर 2026 रोजी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. अ‍ॅन कार्सन या कॅनडाच्या एक अत्यंत प्रसिद्ध कवयित्री, निबंधकार, अनुवादक आणि प्राचीन ग्रीक साहित्याच्या प्राध्यापक आहेत. पारंपरिक साहित्याच्या सीमा मोडून प्राचीन संस्कृती आणि आधुनिकतेचा सुरेख संगम घडवून आणणाऱ्या त्यांच्या प्रयोगशील लेखनशैलीसाठी त्या जगभरात ओळखल्या जातात. कॅनडाच्या ख्यातनाम कवयित्री, निबंधकार आणि अनुवादक अ‍ॅन कार्सन यांना 2026 चा साहित्यातील प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्राचीन आणि आधुनिकतेचा सुरेख संगम घडवत साहित्याच्या पारंपरिक सीमा मोडणाऱ्या त्यांच्या खेळकर आणि विविधांगी लेखनशैलीसाठी रॉयल स्वीडिश अकादमीने हा सन्मान दिला आहे. 76 वर्षीय कार्सन यांनी ‘नॉक्स’ आणि प्राचीन ग्रीक साहित्याच्या अनुवादांतून जागतिक साहित्यात अद्वितीय ठसा उमटवला आहे. कार्सन यांनी स्वतचे जीवन आणि संघर्षही लेखनातून मांडले. कार्सन यांनी उत्तर अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये अभिजात साहित्य शिकवले आहे. कार्सन यांनी स्वतःच्या आयुष्याचाही काही साहित्यकृतींसाठी आधार घेतला आहे. सन 2010 मध्ये प्रकाशित ‘नॉक्स’ या पुस्तकात त्यांचा भाऊ मायकेल अनेक दशके बेपत्ता राहिल्यानंतर झालेल्या त्याच्या मृत्यूचा वेध घेण्यात आला आहे.