हेलिकॉप्टरमध्ये चढताना ममता बॅनर्जींचा तोल गेला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाल्या आहेत. दुर्गापूरहून आसनसोल येथे प्रचारासाठी जात असताना हेलिकॉप्टरमध्ये चढताना तोल गेला आणि त्या पाय घसरून पडल्या. यात त्या किरकोळ दुखापतग्रस्त झाल्या. हेलिकॉप्टरमध्ये बसताना त्यांचा तोल गेल्याने त्या पडल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांची मदत केली. परंतु, त्यांनी पुढील आसनसोलचा दौरा केला. हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना ममता बॅनर्जी पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याआधी 14 मार्च रोजी कोलकाता येथील घरात पडून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)