
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
भाट्ये समुद्रकिनार, रत्नागिरी येथे मार्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना व्यायाम करता यावा याउद्देशाने ओपन जीम उभारण्यात आली. या ओपन जीमचे रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री रविंद्र वायकर म्हणाले की, मुंबईमध्ये येथील समुद्र किंनारी बसविण्यात आलेल्या ओपन जीमच्या धर्तीवर रत्नागिरी येथील समुद्रकिनारी ओपन जीम बसवा अशी मागणी येथील जनतेकडून येत होती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच ओपन जीम बसविण्ययात येत असून भाट्ये समुद्र किनारावर एक ओपन जीम तर झरी विनायक मंदीराजवळ समुद्र किनाऱ्यावर एक अशा दोन ओपन जीम रत्नागिरी येथील समुद्र किनारी बसविण्यात येत आहेत. तीन ओपन जिल्ह्यातील इतर समुद्र किनाऱ्यावर बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भाट्ये ओपन जीमचे काम दोन दिवसात सुरु होत आहे. तसेच भाट्ये समुद्र किनाऱ्याकडे येणारा मार्ग अरुंद असल्याने समुद्र किनाऱ्यावरुन परत जाण्यासाठी स्मशानभूमीच्या बाजूनी जाण्याचा मार्ग करण्यात येत आहे. या समुद्र किनाऱ्यावर शौचालय बांधण्यात येणार असून तेथे समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांना कपडे बदल्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. समुद्र किनारी बसण्यासाठी बेंचेस, एक गजिबोही असणार असून यासाठी 50 लाख एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच समुद्र किनारे स्वच्छ ठेवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी भाट्ये समुद्र किनारी ओपन जीम उपलब्ध करुन देण्यात येत असल्याबद्दल येथे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना पालकमंत्री रविंद्र वायकर यांचे आभार मानले.यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महाडीक, भाटयेचे सरंपच परेश भाटकर, राजेंद्र महाडीक, तसेच भाट्ये येथील नागरिक उपस्थित होते.

































































