
एमपीएससी आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थांना पाठिंबा देण्यासाठी गद्दार खासदार ओमराजे निंबाळकर यांना विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. धाराशिवचे गद्दार खासदार ओमराजे निंबाळकर ‘गो बॅक’ अशा घोषनांनी परिसर दणाणून टाकला.
विद्यार्थ्यांचा विरोध आणि घोषणाबाजी पाहता आंदोलकांचा प्रतिनिधी विवेकानंद पाटीलने विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ओमराजे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. सरकारने आधीच आपल्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. आंदोलनाला गालबोट लागेल असं काहीही करू नका, सरकारला हेच हवं आहे, असं विवेकानंद पाटील याने सांगितले.
ओमराजे निंबाळकर भाषणाला उभे राहताच काही आंदोलकांनी पक्षांतराचा मुद्दा उपस्थित करीत ‘गो बॅक’चा नारा दिला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी एकनाथ शिंदे यांना पह्न करून अध्यक्ष भीमनवारचा राजीनामा मागा अशी मागणी ओमराजेंकडे केली. त्यावर तुमच्या मागणीबाबत मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राजकारणावर बोलण्यापेक्षा तुमचा जो विषय आहे तो घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना विनंती करेन, असे आश्वासन ओमराजे यांनी विद्यार्थ्यांना दिले. परंतु त्यानंतरही विद्यार्थी गो बॅकची घोषणाबाजी करत असल्याने ओमराजे निंबाळकर यांना आपले भाषण उरकते घ्यावे लागले. मोठय़ा पोलीस बंदोबस्तात ओमराजेंना बाहेर काढण्यात आले.

























































