नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, 537 रहिवाशांना उद्यापासून नव्या घराचा ताबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 537 रहिवाशांना उद्या, शुक्रवारपासून नवीन घराच्या चाव्या मिळणार आहेत. नायगाव-दादरमधील टॉवर क्र. पाचच्या तळमजल्यावरील म्हाडा प्रकल्प कार्यालयात रहिवाशांना घराचा ताबा मिळणार आहे. गेल्या दोन ते तीन पिढ्यांपासून 160 चौरस फुटाच्या लहानशा खोलीत राहणाऱया बीडीडीवासीयांना तब्बल 500 चौरस फुटांचे टू बीएचके घर मिळणार आहे.

वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाले असून म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वेळोवेळी या प्रकल्पांना भेट देऊन तेथील कामाच्या प्रगतीचा आढावा घेतात. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या 6.45 हेक्टर जागेवरील 42 चाळींमध्ये 3344 भाडेकरू वास्तव्यास आहेत. दोन टप्प्यांत राबविण्यात येणाऱया प्रकल्पात 23 मजल्यांच्या 20 पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. या प्रकल्पामधील पुनर्वसन इमारत क्र. 1 मधील टॉवर क्र. 1 ते 3 ला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. रहिवाशांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत सार्वजनिक सुट्टी सोडून वितरण पत्रांचे वाटप केले जाणार आहे.

 नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’असे नामकरण करण्यात आले आहे. या पुनर्विकास प्रकल्पात दोन पुनर्वसन इमारतीत एकूण 20 टॉवर बांधण्यात येत आहेत. यात पुनर्विकास प्रकल्पाच्या पुनर्वसन इमारत क्र. 1 मधील 8 टॉवर्सपैकी 5 टॉवर्समधील 864 सदनिकांचे वितरण 16 मार्च रोजी क

 वितरण पत्र, ताबा स्वीकारतेवेळी लाभार्थ्यांनी पुनर्वसन सदनिका करारनामा, आधार कार्ड व पॅन कार्डची छायांकित प्रत, संक्रमण शिबीर सदनिकाधारकांचे हमीपत्र (500 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर नोंदणीकृत नोटरी केलेले), सदनिकाधारकांचे पासपोर्ट साईजचे तीन रंगीत फोटो, कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो या आवश्यक कागदपत्रांसह रहिवाशांनी व्यक्तिशः उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. निवासी सदनिकांचे वितरण टॉवर क्रमांक 2, 1, व 3 या क्रमाने करण्यात येणार आहे.