
सध्या मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. विकी कौशल-कतरिना कैफ, राजकुमार-पत्रलेखा, श्रद्धा आर्या अशा अनेक सेलिब्रिटींची लगीनघाई चर्चेत आहे. अजून एका अभिनेत्रीने 14 नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे.
या अभिनेत्रीचं नाव निकिता शर्मा आहे. निकिताने 14 नोव्हेंबर रोजी उत्तराखंड येथे लग्न केलं. जिथे अनेक सेलिब्रिटी डेस्टिनेशन वेडिंगचा पर्याय निवडतात. पण, निकिताने उत्तराखंड येथील एका जुन्या मंदिरात लग्न केलं आहे.
या मंदिराला त्रियुगी नारायण मंदिर म्हणतात. हे विष्णु मंदिर आहे. असं म्हणतात, की याच मंदिरात शिव पार्वतीचा विवाह झाला होता. त्याच मंदिरात निकिताने विवाह केला आहे.
View this post on Instagram
निकिताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने देखील फोटो शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे.
View this post on Instagram




























































