दीड वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्मची संख्या झाली दुप्पट, सर्वेक्षणातील माहिती

1056

लॉकडाऊनदरम्यान थिएटरसह चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रस्थ वाढले आहे. गेल्या दीड वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्मची संख्या दुप्पट म्हणजे 40 करून 80 वर पोहोचली असून या प्लॅटफॉर्मवर ओरिजनल कंटेंट देण्यात हिंदुस्थानी आघाडीवर असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

‘लेट्स ओटीटी ग्लोबल डॉट कॉम’ने हे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार लॉकडाऊनदरम्यान ओटीटीवरील प्रेक्षकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे आढळले आहे. याबाबत हंगामाचे सीईओ सिद्धार्थ रॉय म्हणाले, ‘ओटीटीवर विविध भाषेत ओरिजनल कंटेंट उपलब्ध असल्याने आणि लॉकडाऊनमधील वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे या प्लॅटफॉर्मची आणि त्यावरील प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. देशात सध्या ‘नेटफ्लिक्स’, ‘ऑल्ट बालाजी’, ‘एम एक्स प्लेयर’, ‘ऍमेझॉन प्राईम’, ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’ आदी ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत. मार्च ते जुलै या कालावधीत ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकसंख्या 30 टक्क्यांनी वाढली असून 2023 पर्यंत या इंडस्ट्रीत 45 टक्के वाढ होईल, अशी शक्यता अहवालात वर्तवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या