Photo – केतकीच्या बिनधास्त अदा, तरुणाई फिदा

ketaki-mategaonkar

घारे डोळे, कुरळे केस, मादक नजर सफेद रंगाची लेहंगा चोली, त्यावर आरशांचं आकर्षक विविध रंगी नक्षीकाम अशा खास लूकमधला एक फोटो अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) हिने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. केतकीच्या या फोटोवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. तिच्या या अदांवर तरुणाई फिदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

केतकीनं हा फोटो पोस्ट करताना त्याचे क्रेडिट्सही टाकले आहेत. अक्षय परांजपे यांनी हे फोटोशूट केलं आहे. विनोद सरोदे हे मेकअप आर्टिस्ट आहेत. तर पुण्यातील जेएल लेक व्यूव्ह रेस्टोरंटमध्ये हे फोटोशूट करण्यात आलं होतं. त्याचे फोटो तिनं आता प्रसिद्ध केले आहेत.

सारेगमप… कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांच्या मनाला साद घालणारी केतकी आता मराठीमध्ये अभिनेत्री म्हणूनही आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. तिच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली आहे. शाळा, आरोही, काकस्पर्श, तानी, टाइमपास, टाइमपास 2, काकस्पर्श (तामिळ), काकस्पर्श (हिंदी), फुंत्रो अशा चित्रपटातून तिने आपली ओळख निर्माण केली आहे.

केतकीच्या गोड गळ्याला रसिकांनी जशी दाद दिली, तशीच दाद तिच्या अभिनयालाही मिळाली आहे.

केतकीचे शाळा आणि टाइमपास हे दोन चित्रपट चांगलेच गाजले. तिच्या या चित्रपटांतील भूमिकेसाठी प्रेक्षकांनी तिचं खूप कौतुकही केलं.

आपली प्रतिक्रिया द्या