
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीमध्ये जास्तीत जास्त स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावे यासाठी शिवसेनेचा स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ प्रयत्नशील आहे. त्यामुळे इच्छुक भूमिपुत्रांनी अर्ज करावेत, असे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले आहे.
स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना नेते, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष आमदार विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार पूर्व परीक्षेचे मोफत ऑनलाइन/ऑफलाइन प्रशिक्षण वर्ग भरवण्यात येणार आहेत. त्यामुळे बँकेच्या वयोमर्यादेची अट व नियमांमध्ये योग्य ठरणाऱ्या इच्छुकांनी ८ जुलैपर्यंत https://sbi.co.in/web/careers/current-openings या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले आहे.
प्रशिक्षण वर्गासाठी संपर्क
नोकरभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी शिवसेना भवन येथील महासंघाच्या कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत चिटणीस शरद एक्के (९८९२६९९२१५), श्रीराम विश्वासराव (९८६९५८८४६९), विलास जाधव (९६१९११८९९९), सुधाकर नर (८३६९४४२९५१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्गप्रमुख उमेश नाईक यांनी केले आहे.






























































