जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये संशयास्पद हालचालींची माहिती; सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी गुरुवारी सीमावर्ती भागात शोध मोहीम सुरू केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही मोहीम बिलावर वनक्षेत्रातील उधमपूर-कठुआ सीमेजवळील जंगलात राबवण्यात आली.

बुधवारी रात्री उशिरा बिलावर भागातील एका गावातील घराचा दरवाजा अज्ञात व्यक्तींनी ठोठावला होता. त्या कुटुंबाने दरवाजा उघडला नाही, परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना घरात ठेवलेले अन्न गायब असल्याचे आढळले. त्यामुळे कोणीतरी घरात घुसले असावे, असा संशय निर्माण झाला.

कठुआचे पोलीस अधीक्षक (ऑपरेशन्स) प्रीतपाल सिंग यांनी सांगितले की, सीमावर्ती भागात सतर्कता राखण्यासाठी अशा नियमित मोहिमा राबवल्या जातात. सतर्कता राखण्यासाठी या नियमित मोहिमा राबवल्या जातात. संशयास्पद हालचालींच्या वृत्ताबाबत सांगायचे तर, हा सीमावर्ती भाग आहे आणि ती बाब लक्षात घेऊनच आम्ही ही मोहीम राबवत आहोत, असे सिंग म्हणाले.