सात ड्रग्ज तस्करांना पकडून दीड कोटीचा ड्रग्ज हस्तगत; अमली पदार्थविरोधी कक्षाची कारवाई

 

 

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पथकांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत सात ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या एक कोटी 24 लाख किमतीचे हेरॉईन आणि 12 लाख किमतीचे एमडी हस्तगत करण्यात आले.

कांदिवली युनिटला मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने मालाड आणि वसई विरार परिसरात सापळा रचून चार तस्करांना पकडले. त्यांच्याकडे 310 ग्रॅम वजनाचा व एक कोटी 24 लाख किमतीचा हेरॉईन ड्रग्ज मिळून आला. हा ड्रग्ज त्यांनी कुठून आणला आणि ते कोणाला विकणार होते याचा पोलीस तपास करीत आहेत. तर अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटने कुर्ल्यातून तिघांना पकडले. त्या तिघांनी नशेबाजांना विकण्यासाठी आणलेला 60 ग्रॅम वजनाचा व 12 लाख किमतीचा एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आला.