
कॅनडामधील अल्बर्टा प्रांतात असलेल्या लष्कराच्या तळावर भीषण आग लागली असून या दुर्घटनेत काही लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. कॅनडाचे संरक्षण मंत्री डेव्हिड मॅकगुइंटी यांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली. ‘ही आग अत्यंत भीषण असून यात काही जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप अधिकृत आकडा हाती लागला नसल्याचे मॅकगुइंटी यांनी सांगितले.
A serious incident creating a major fire has occurred at CFB Wainwright, in Alberta.
Our thoughts are with all the brave women and men affected.
We are working closely with the Government of Alberta and local authorities. Premier Smith and I are in close contact as are our relevant ministers and officials.
— Mark Carney (@MarkJCarney) October 18, 2026
सध्या कॅनडाच्या लष्करासह स्थानिक प्रशासकीय यंत्रणा मदत व बचाव कार्यात युद्धपातळीवर उतरली आहे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ही आग आजूबाजूच्या परिसरात झपाट्याने पसरत असून अग्नीशमन दलाची यंत्रणा लष्कराच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ही आग कशी लागली याचा तपास देखील रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस करत असल्याचे मॅकगुइंटी यांनी सांगितले आहे.
या भीषण दुर्घटनेवर पंतप्रधानांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत, ‘या दुर्घटनेतील बाधितांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,’ अशा शब्दांत संवेदना व्यक्त केल्या.

























































