
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बॉलीवूडला दणका दिला. राज्यात बंदी असलेल्या विमल पान मसाला व इलायचीची जाहिरात केल्याबद्दल एफडीएने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. पान मसाल्याच्या नावाखाली तंबाखूयुक्त गुटख्याचीच जाहिरात केल्याचा ठपका एफडीएने ठेवला आहे.
n जाहिरात तत्काळ थांबवा, सोशल मीडियावरील तुमच्या अधिकृत हँडल आणि वेबसाईटवरून या जाहिरातीशी संबंधित सर्व मजकूर डिलीट करा आणि या जाहिरातीबद्दल 15 दिवसांत स्पष्टीकरण द्या असे निर्देश एफडीएने या तिघांना पाठवलेल्या नोटिसीमध्ये दिले आहेत.




























































