शहापूरच्या दुर्गा व स्वधाची ‘इस्रो’ भरारी, भारत टॅलेंट सर्च परीक्षेत यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य स्तरावरील भारत टॅलेंट सर्च परीक्षेत शहापूर तालुक्यातील दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. परीक्षा पास झाल्यामुळे स्वधा हरमळकर आणि दुर्गा दिनकर या मुलींची भारतीय अंतराळ संशोधन (इस्रो) संस्थेने आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे. दुर्गा व स्वधाच्या भारत टॅलेंट सर्च परीक्षा विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता, वैज्ञानिक दृष्टीकोन, तर्कशक्ती आणि सर्वांगीण गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी ‘इस्रो’ भरारीमुळे शहापूर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे

भारत टॅलेंट सर्च परीक्षा विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता, वैज्ञानिक दृष्टीकोन, तर्कशक्ती आणि सर्वांगीण गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी आयोजित केली जाते. या स्पर्धेत देशभरातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. ही परीक्षा आसनगाव येथील एन. जे. बेलवले पब्लिक स्कूलची सहावीची विद्यार्थिनी स्वधा हरमळकर आणि जिल्हा परिषद शाळेची पाचवीत शिकणारी दुर्गा दिनकर उत्तीर्ण झाल्या. दोन्ही विद्यार्थिनींनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर इस्त्रो शैक्षणिक सहलीत स्थान मिळवले आहे. इस्रो शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन केंद्रांना भेट देण्याची, उपग्रह निर्मिती, रॉकेट प्रक्षेपण तंत्रज्ञान, वैज्ञानिक संशोधन प्रक्रिया तसेच देशाच्या अंतराळ मोहिमांची सखोल माहिती जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी आणि संशोधन क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रेरणा मिळावी हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

प्रेरणादायी यश
विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष माहिती मिळवण्याची संधी दोन्ही विद्यार्थिनींना या सहलीमुळे मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मिळालेली ही संधी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.