
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून दररोज हजारो भक्त येत असतात. झटपट दर्शन आणी आरती पास काढून देण्याच्या नावाखाली शिर्डीत अनेकजण गोरखधंदा करत असल्याचे आरोप अनेकदा झाले आहेत. सुरक्षा रक्षकांशी असलेले आर्थिक संबधातून पैसे कमावण्याचा अनेकांनी धंदा सुरू केल्याने आता ग्रामस्थही आक्रमक झालेले. त्यामुळे शिर्डीतील ग्रामस्थ आणी साईमंदिर प्रशासनाची आज झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. त्यानुसार आता भक्तांना आरती पास आता काऊंटवर मिळणार आहेत.
येत्या दहा पंधरा दिवसात चर्चेत निर्णय झालेल्या विषयांची अंमलबजावणी केली जाणार असून यामुळे साईभक्त आणी ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिर्डीतील साईमंदिर प्रशासन आणी ग्रामस्थांमध्ये झालेल्या बैठकीत साईभक्त आणी ग्रामस्थांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. भक्तांना शिफारशीने दिले जाणारे आरती पास आता थेट दिले जाणार असून ग्रामस्थांसाठीही आधार कार्ड दाखवून ३ नं.प्रवेशद्वाराहून एन्ट्री मिळणार. ग्रामस्थांसोबत अन्य कुणालाही सोडले जाणार नाही. साईसंस्थान कर्मचाऱ्यांना साईभक्तांसोबत वागण्याचे प्रशिक्षण दिलं जाणार.साई मंदिरात दर्शनाचा होणारा काळाबाजार आता थांबणार.साई मंदिरातील साईराम बंद करण्यासाठी साई संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांचे कठोर पाऊल.




























































