
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात 16 सप्टेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गटाच्या वकिलांनी गुरुवारी आपला युक्तिवाद सुरू केला, पक्ष आणि चिन्हाबाबत अनेक तर्क त्यांनी मांडले. त्यात ठोस काहीच नव्हते. आता दोन आठवडय़ांनंतर होणाऱ्या पुढील सुनावणीवेळी गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात शिवसेनेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.

























































