
मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या शाखा क्र. 65 च्या महिला शाखा संघटक रेवती सुर्वे यांचे आकस्मित निधन झाले. त्या 50 वर्षांच्या होत्या. अंबोली स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती रमेश सुर्वे व दोन मुले असा परिवार आहे. रेवती या निष्ठावंत शिवसैनिक होत्या. विविध आंदोलने आणि उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रीय सहभाग राहिला.




























































