
ठाणे गुन्हे शाखेत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेतील २० पोलीस अधिकाऱ्यांच्या विविध घटक आणि विशेष कक्षांमध्ये अंतर्गत नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या खांदेपालटमुळे गुन्हे तपास आणि विशेष पथकांच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ठाणे गुन्हे शाखा १च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अनिल शिंदे, उल्हासनगर गुन्हे शाखा ४च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी राजेश गज्जल यांची तर वागळे इस्टेट गुन्हे शाखा ५च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी गोरखनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जनार्दन सोनवणे यांची अमली पदार्थ विरोधी कक्षातून मालमत्ता गुन्हे कक्षात, सचिन गायकवाड यांची अमली पदार्थ विरोधी पथकात तर प्रफुल्ल जाधव यांची मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या ठिकाणी रुजू राहण्याचे आदेश
सलील भोसले एमपीडीए, महेश काळे कल्याण, अमोल वालझाडे ठाणे, विश्वास शिंगाडे यांच्याकडे मालमत्ता गुन्हे कक्ष, नितीन खाडे मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, अजय कुंभार, सचिन कुंभार यांची मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, दीक्षा ढाकरे खंडणी विरोधी पथक, बळवंत भराडे अनैतिक मानवी वाहतूक कक्ष आणि दीपक डुम्मलवाड यांची अमली पदार्थ विरोधी पथकात नियुक्ती करण्यात आली असून अधिकाऱ्यांना तत्काळ नव्या ठिकाणी रुजू राहण्याचे आदेश पोलीस सहआयुक्त पंजाबराव उगले यांनी दिले आहेत.


























































