एसईबीसीच्या विद्यार्थ्यांकडूनही फीवसुली केली जातेय – कैलास पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशी विद्यापीठे नवी मुंबईत आणतोय, पण मराठवाडय़ासारख्या विभागात धाराशीवमध्ये संपूर्ण विद्यापीठ स्थापन व्हावे. विद्यापीठ उपपेंद्राचे रूपांतर संपूर्ण विद्यापीठात करावे, अशी मागणी यावेळी आमदार कैलास पाटील यांनी केली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे सवलती द्यायचा निर्णय घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. जी विद्यापीठे व महाविद्यालये आहेत ती आज खुल्या प्रवर्गाप्रमाणेच एसईबीसीच्या विद्यार्थ्यांकडून फीवसुली करतात, असे सांगतानाच पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीयरिंगमध्ये फीसाठी एसईबीसीचा कॉलमच नाही, याचा दाखला त्यांनी दिला.

सावित्रीबाई फुले आधार योजनेत वसतिगृह मिळत नाही त्यांना 60 हजार रुपये सरकार देते, पण त्यात विद्यार्थी संख्येची मर्यादा घातली गेली. प्रतिजिल्हा 600 ची मर्यादा आहे. ती काढली पाहिजे. ‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’ या योजनांमध्येही महागाईनुसार मर्यादा वाढवण्याची गरज आहे. ‘कमवा आणि शिका’ योजनेचा भत्ताही वाढला पाहिजे, अशा सूचना पैलास पाटील यांनी मांडल्या.